चर्चिल, सर विन्स्टन
चर्चिल, सर विन्स्टन : (३० नोव्हेंबर १८७४ — २४ जानेवारी १९६५) ब्रिटनचा युद्धकाळातील पंतप्रधान, वृत्तपत्रकार, साहित्यिक व एक थोर राजकारणपटू. त्यांचे पूर्ण नाव विन्स्टन लेनर्ड स्पेन्सर चर्चिल. ब्रिटनच्या प्रसिद्ध मार्लबरो या उमराव घराण्यात त्यांचा ऑक्सफर्डशर येथे जन्म झाला.